पुरंदर | ओबीसी नेते लक्ष्मण हाके, 13 जानेवारीला पुरंदर तालुक्यातील गावांमध्ये संवाद साधणार

 


 

पुरंदर | प्रतिनिधी 

             ओबीसी नेते लक्ष्मण हाके पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत, 13 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता घोडे उड्डाण येथील म्हस्कोबा मंदिर दर्शन, तसेच वीर येथील म्हसकोबा मंदिर दर्शन घेणार आहेत जानेवारी रोजी पुरंदर तालुक्यातील जेऊर, मांडकी, वीर येथे सायंकाळी 5 वाजता. ओबीसी बहुजन बांधवांशी संवाद साधणार आहेत.



 लक्ष्मण हाके यांनी बारामती नगरपालिका निवडणुकीमध्ये काळुराम चौधरी यांचा व अपक्ष उमेदवार यांचा जोरदार प्रचार केला होता. त्यात काही ठिकाणी यश आले. संघमित्रा काळुराम चौधरी, यांच्यासहित ओबीसी बहुजन यांचे जवळपास 6 जण राष्ट्रवादीच्या विरोधात निवडून आले  ओबीसी बहुजन एकत्र आल्यामुळे विजय मिळाला असल्या मुळे आता पुरंदर तालुक्यात ओबीसी बहुजन, आणि प्रस्थापितांच्या विरोधात जिल्हापरिषद निवडणुकीमध्ये एकत्र येणार आल्यामुळे  लक्ष्मण हाकेंचा पुरंदर तालुक्याचा दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे पुरंदर तालुक्यातील दौऱ्यामुळे ओबीसी बहुजन कार्यकर्त्यांना बळ मिळेल  असे दौरा प्रमुख बापूराव सोलनकर, देवेंद्र बनकर सतीश वचकल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले

Post a Comment

0 Comments